Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी आचार्य अत्रे यांनी मुंबईत सत्तर आणि महाराष्ट्रात तीस अशी शंभर भाषणं केली. प्रत्येक भाषण दोन तासांचं ! नवयुगमधून दहा हजार पृष्ठं होतील इतकं लेखन केलं मराठामधून चळवळीचा जोर रोजच्या रोज पेटता ठेवला. सरतेशेवटी महाराष्ट्र राज्य झालं! एक लाख लोकांची मशाल मिरवणूक निघाली. हुतात्मा चौकात हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करून आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणाले, झालाच पाहिजे ह्या आपल्या रणगर्जनेला शिवाजी महाराजांच्या 'हरहर महादेव' ह्या रणगर्जनेचं महत्व आलं होतं झालाच पाहिजे ना? मग तो आज झाला आहे. मुंबई मिळाल्याचा आनंद जेवढा मोठा, त्यापेक्षाही महाराष्ट्र राज्य भारताच्या नकाशावर आलं हा आनंद सहस्रपटीने मोठा... भारताच्या नकाशावर आलेल्या महाराष्ट्र राज्याची यशोगाथा, मंगलगाथा आचार्य अत्रे यांच्या शैलीत, त्यांच्याच घणाघाती भाषेत, बाळ ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांच्या व्यंगचित्रांसह.
Share
