Shipping calculated at checkout.
'शब्दयोगी अव्यय म्हणजेच Preposition. वाक्यातल्या मागच्या-पुढच्या शब्दांना ही अव्यये जोडतात. पण तरीही above किंवा over कधी वापरायचं, in आणि into मधला नेमका फरक काय, हे प्रश्न मनाला पडतातच. इंग्रजी भाषेत एकूण 179 शब्दयोगी अव्यये आहेत. अर्थाच्या सूक्ष्म आणि चमत्कृतिपूर्ण छटा व्यक्त करण्याची या अव्ययांची क्षमता केवळ अफाट आहे. हे सगळे कॅलिडोस्कोपिक कंगोरे या विस्तृत कोशात आहेत. या ‘Prepositions’चा अभ्यास केला, तर निर्दोष आणि सहजसुंदर इंग्रजी साध्य होईल. यासाठी हे नमुने पाहा. 1. माझ्या पाठीत दुखत होते. I had a pain across my back. 2. तो विक्रम कोणी केला? Who was that record by? 3. तिने केसांचा अंबाडा घातला होता. She was wearing her hair in a bun. 4. कपाचा कान तुटला आहे. The handle on the cup is broken. 5. मी ती कादंबरी दिवाळीच्या सुट्टीत वाचली. I read that novel over the Diwali holidays. '