Regular price
Rs. 396.00
Regular price
Rs. 440.00
Sale price
Rs. 396.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
सन २०३२, ज्यो बेंटन अमेरिकेचा अठ्ठेचाळीसावा प्रेसिडेंट म्हणून निवडून आला होता. विजयाच्या घोषणेनंतर लगेच आधीच्या प्रेसिडेंटबरोबर झालेल्या त्याच्या भेटीत त्याला सांगण्यात आलेल्या एका प्रखर सत्याने राष्ट्राध्यक्षपदाची विजयमाला गळ्यात पडण्यापूर्वीच त्यातील काट्यांची बोच त्याला जाणवू लागली आणि त्या सत्याने मिळवलेल्या गौरवशाली विजयाची धुंदीही खाडकन उतरवली. पर्यावरणातील बदलांमुळे निर्माण झालेल्या `ग्लोबल वॉर्मिंग`चे - जागतिक तपमानवाढीचे - परिणाम महासागरातल्या पाण्याच्या पातळ्या वाढण्यात दिसू लागले होते. त्या पातळ्या किती वेगाने आणि किती प्रमाणात वाढतील यांविषयी तज्ज्ञांनी, संशोधकांनी जे आकडे यापूर्वी प्रसिद्ध केले होते ते फार फार कमी धरले गेले होते असे प्रगत तंत्रज्ञानाने दाखवून दिले होते. सत्य हे होते की ते बदल प्रचंड वेगाने घडत होते आणि जग विनाशाच्या कड्यावरच उभे होते. जर वायुवेगाने हालचाली करून पर्यावरणाचा तोल सांभाळण्यासाठी आवश्यक ती कार्बन उत्सर्जन कपात प्रत्येक देशाने केली नाही तर जगाचा विनाश जवळ होता आणि अटळ होता. जगातील सर्वात जास्त प्रदूषण निर्माण करणाऱ्या चीन या देशाच्या शासनाबरोबर आधीच्या प्रेसिडेंटनी कार्बन कपातीसंबंधी गुप्तपणे बोलणी सुरू केली होती. तीच चर्चा पुढे नेऊन त्या जागतिक समस्येवर तातडीने तोडगा काढून, स्वत:च्या देशाला आणि संपूर्ण जगाला वाचवण्याच्या ज्यो बेंटन याने केलेल्या प्रयत्नात दोन मुत्सद्दी गटातल्या बुद्धीबळाच्या खेळाचे रूपांतर हळूहळू, स्वार्थापुढे कशाचीही तमा न बाळगणाऱ्या राजकारण्यांच्या निर्दयी कारस्थानांनी जगातल्या दोन `महासत्ता`, चीन आणि अमेरिका महाभयंकर अण्वस्त्रांंच्या महायुध्दात समोरासमोर उभ्या ठाकण्यात झाले. त्या युद्धाने ज्यो बेंटनच्या मनोबलाची, तत्त्वनिष्ठेची कसोटी पाहिली. तो त्या कसोटीला पुरेपूर उतरला. येणाऱ्या पिढ्यांना त्याने एका सुंदर, सुरक्षित जगाची हमी दिली पण त्यासाठी त्याला मात्र त्याची पुढची पिढी गमवावी लागली !! पानापानात उत्कंठा वाढवत नेऊन वाचकाला एका धक्कादायक उत्कर्षिंबदूवर नेऊन ठेवणारी, `पर्यावरणाच्या राजकारणा`ची आणि त्यापासून जगाला वाचवण्याची शर्थ करणाऱ्या अमेरिकेच्या ध्येयवादी प्रेसिडेंटची ही मनाला अस्वस्थ करणारी खळबळजनक कथा !!