Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Condition

टीव्हीविषयी माझ्या मनात प्रचंड कृतज्ञता आहे. ह्या क्षेत्रानं असंख्य कलावंत मित्रमैत्रिणींना सन्मान आणि सुबत्ता मिळवून दिलीय. अहोरात्र चालणारी ही करमणुकीची यंत्रणा मुग्धा या पुस्तकातून आपल्याला समजावून सांगते. ती आरोपीचा वकील अजिबात होत नाही. ह्या क्षेत्राला कमी लेखणा-यांना ती दूषणं देत नाही. प्रत्येक लेखातून उलगडत जाते मालिका-खिंड लढवणा-या कित्येकांच्या मेहनतीची गोष्ट. मुग्धाच्या पुस्तकाची सफर अत्यावश्यक आहे. कारण ९०³ घरांमध्ये टीव्ही आहे. कॉलेजमध्ये असताना एकांकिका विश्वात कुतुहलानं वावरत असल्यापासून मी मुग्धाला ओळखते. तिचं मोहक व्यक्तिमत्त्व बघता ती अभिनयक्षेत्रात रमणार, ही अटकळ मनाशी बांधणं सोपं होतं. पण पुढे मुंबईत स्थिरावताना तिनं मालिकांचं लेखन सुरू केलं आणि आज ती त्यातही यशस्वी आहे. मुग्धा तिच्या प्रवासात सजगपणे चालत राहिली. स्वत:च्या प्रवासाकडे ती प्रांजळपणे पाहू शकतेय. आता त्यातले बारकावे ती आपल्यासाठी खुले करतेय. अभ्यासू तरी रंजक अशी ही शोधकथा मनोरंजनासाठी आसुसलेल्या असंख्य प्रेक्षकांसाठी मोलाची ठरणार आहे. सोनाली कुलकर्णी

View full details