1
/
of
1
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
इस्तंबूलमध्ये काहीतरी विलक्षण घडत आहे. एक पिसाट खुनी मोकाट सुटला आहे आणि शहरातील ट्रान्सव्हस्टाईटचे एकापाठोपाठ एक खून होत चालले आहेत. प्रत्येक खुनानंतर परिस्थितीचा गुंता वाढत चाललाय. या कथानकाचा नायक हा इस्तंबूलच्या रंगेल जीवनातील एक प्रख्यात असामी असतो. तो दिवसा संगणक-तज्ज्ञ व रात्री ट्रान्सव्हस्टाईट असे दुहेरी आयुष्य जगत असतो. दिवस मावळल्यावर ओठांना लिपस्टीक लावून स्त्री-वेशात तो या खुनांचा शोध घ्यायचं ठरवतो खरं; पण खुनाच्या मागे असलेल्या माथेफिरू शक्तींचा सामना करणं वाटतं तेवढं सोपं नसतं आणि प्रकरण अंगावर शेकण्याची वेळ येते. कथानायिकेच्या रूपातील आपला कथानायक त्यातून मोठ्या चातुर्याने मार्ग काढतो. ट्रान्सव्हस्टाईट, समलिंगी वेश्यांच्या अनोख्या जीवनावर आधारित विनोदी धाटणीची चातुर्यकथा. अशा प्रकारचा किंचित चावट पण प्रसंगनिष्ठ व बौद्धिक विनोद मराठीत प्रथमच येत आहे. ही कथा तुर्की आणि युरोपियन संस्कृतीचा संगम म्हणून प्रसिद्ध असलेल्या इस्तंबूल शहरात घडते. कथानकाच्या ओघात बॉस्फोरच्या निळ्याशार समुद्रकाठी वसलेले इस्तंबूल शहर व तुर्की संस्कृतीचा परिचय होतो. बोरेक आणि राकीची चव चाखून पाहावी असा मोह होतो. युरोव्हिजन गाजवणा-या तुर्की गाण्यांचे सूर ऐकू येऊ लागतात आणि आपले पाय नकळत ठेका धरतात... ‘यालारिम यालारिम यालारिम...’
Share
![THE PROPHET MURDERS by MEHMAT MURAT SOMAR / Translators : JAYANT GUNE](http://bookvariety.com/cdn/shop/files/The-Prophet-Murders-FC.jpg?v=1728026412&width=1445)