Shipping calculated at checkout.
अर्चना मिरजकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या या पुस्तकातील कथा महाभारतातील स्त्रियांवर आधारित आहेत. कुंती, रूक्मिणी, हिडिंबा, उलूपी आणि चित्रलेखा यांसारख्या या कथांतील नायिकांनी आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेतले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या जीवनाची वाटचला केली आहे. किंबहूना, महाभारतातील काही उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नायकांपुढे त्यांनी काही प्रस्ताव मांडले आहेत. या प्रस्तावांचे महाभारताचे कथानक घडविण्यात मोठे योगदान आहे.
अत्यंत प्रभावी व्यक्तिचित्रण, नाट्यमय प्रसंगलेखन आणि सुंदर निसर्गचित्रे यामुळे या कथा वाचनीय बनल्या आहेत. अर्चना मिरजकर यांची भाषा इतकी ओघवती आहे की एखादी कथा वाचायला घेतली की ती पूर्ण वाचल्याशिवाय राहवत नाही. त्यामुळे हे पुस्तक अत्यंत रंजक आणि चोखंदळ वाचकांनी आपल्या संग्रही ठेवण्यासारखे झाले आहे.