Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 269.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 269.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language

हिंदी चित्रपटसृष्टीतला संगीताचा सुवर्णकाळ जेवढा संगीतकारांच्या अविस्मरणीय रचनांनी गाजला, तेवढाच तो प्रतिभावान गीतकारांच्या आशयसंपन्न काव्याने बहरला.
सामाजिक आणि वैचारिक पाश्र्वभूमीतून आलेल्या या गीतकारांनी प्रेमगीतं, युगुलगीतं आणि मानवी जीवनातल्या सर्वच भावभावना उत्कटतेने व्यक्त करणारी गीतं सर्जनशीलतेने लिहिली आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवांचा वेध घेणारी गीतंही संवेदनशीलतेने रचली.
अशा चतुरस्र गीतकारांमध्ये शैलेंद्र हे महत्त्वाचं नाव! ‘ओ सजना बरखा बहार आयी’, ‘दम भर जो उधर मूँह फेरे’, ‘पान खाएँ सैंया हमारो’, ‘जीना इसी का नाम है’, ‘आज फिर जिने की तमन्ना है’, ‘सुहाना सफर और…’ अशी वैविध्यपूर्ण आशयाची गीतं रचून त्यांनी रसिकांना सहजसोप्या शब्दांत विचारप्रवृत्त केलं, गीतांना तत्त्वज्ञानात्मक डूब देऊन प्रगल्भ केलं आणि तरल गीतांनी रिझवलंही…!
या पुस्तकात गीतकार शैलेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंची ओळख करून दिली आहे. तसंच त्यांच्या गीतांच्या चित्रणाची वैशिष्ट्यंही उलगडून सांगितली आहेत. ‘तीसरी कसम’ हा शैलेंद्र यांनी निर्मिलेला चित्रपट म्हणजे त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय… त्या चित्रपटाची पडद्यावरील आणि पडद्यामागील कहाणीही यात वाचायला मिळेल.
प्रसिद्ध चित्रपट-आस्वादक विजय पाडळकर यांनी घेतलेला शैलेंद्र यांच्या गीतमय जीवनप्रवासाचा हा विविधांगी वेध… ‘सुहाना सफर और…!’


Life and work of veteran lyricist in Bollywood – Shailendra! A reader can revisit the golden era of Bollywood music. Shailendra wrote all kinds of songs for successful films. It also tells about many behind the scene memories of various Hindi film songs. While reading about Shailendra, his life, struggles, how he carved his own niche in the industry, his passion of film making etc. This book is a kaleidoscope for film researchers and critics too.

View full details