Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 89.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 89.00
Sale Sold out

Out of Stock

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language

हे पुस्तक म्हणजे पाककृतींचा संग्रह नव्हे . पाककौशल्यात पुस्तकी ज्ञानापलीकडले बरेच काही असते . आई – आजीकडून मिळणाऱ्या ज्ञानालाही सीमा असणार . म्हणूनच अनेक घरातील ‘ अनुभवांचे सार ‘ जर एकदम हाती पडले तर सोन्याहून पिवळे नाही का ? हेच वैशिष्ट्य असलेले १२०१ उपयुक्त टीपा असलेले हे पुस्तक फावल्या वेळेत वाचत गेल्यास कसे उपयोगी पडेल याची कल्पना येईल . उदाहरणार्थ लोणचे घालायचे तर ‘ साठवणीचे पदार्थ ‘ हा विभाग ‘ सल्लागार ‘ ठरतो . पुरण पोळी बनविण्यापूर्वी ‘ पक्वान्ने ‘ विभागातील सूचना कामी येतात . तसेच ‘ गुलाबजाम कडक झाले ‘ , ‘ भाजीत मीठ जास्त झाले ‘ , अशा संकटसमयी हे पुस्तक तत्परतेने मदतीला धावून येते . – पूर्वतयारी – अल्पोपहार – भाज्या – भात – डाळी – कडधान्ये – फळे – पक्वान्ने । उपवासाचे पदार्थ – साठवणीचे पदार्थ – विविधा , अशा नऊ ‘ सल्लागार ‘ विभागांनी सुसज्ज असे हे ‘ हँडबुक ‘ सर्व गृहिणींच्या पाककौशल्यात भर टाकेल आणि इतर अनेक प्रकारे विशेष उपयोगी ठरेल .

View full details