Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 338.00
Regular price Rs. 375.00 Sale price Rs. 338.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Condition

‘सीतामाते, एक खचलेली, दीनवाणी अबला भेटेल, अशा भ्रमात मी होतो. मला भेटली एक कणखर करारी स्त्री!' ही हनुमंताला दिसलेली सीता... आणि लक्ष्मण मूर्च्छित पडल्यावर - या सा-या महायुद्धाला आपला सुवर्णमृगाचा मोह कारणीभूत ठरला, असं वाटून ‘पार्वतीमाते, एक वेळ मला श्रीरामाच्या आयुष्यातून वजा कर, पण लक्ष्मणाचे प्राण वाचव...' असा विलाप करणारी सीता... खरंच, कशी होती सीता? विचारी आणि खंबीर? की हतबल आणि भावुक? नियतीची बळी ही सीतेबद्दलची धारणा खरी, की रामरक्षेतलं तिचं ‘सीताशक्ति:' हे रूप खरं? महर्षी वाल्मिकींनी चितारलेल्या सीतेच्या विविध प्रतिमांचा समृद्ध वेध घेणारी अभिराम भडकमकर यांची कादंबरी

View full details