Regular price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 126.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
विकास' ही संकल्पना सध्या केवळ 'भौतिकवाढी'त अडकून बसली आहे _ संकुचित झाली आहे. दरडोई उपभोग वा दरडोई जी.एन्.पी. वाढवणं ह्या झापडबंद रीतीनं 'विकासा'चा आलेख चढता ठेवण्याचा सध्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या मनांवरचं ह्या संकल्पनांचं गारूड इतकं बळकट आहे की, त्यांचे व्यक्ती, समाज आणि पर्यावरण ह्यांच्यावर होणारे भयंकर दुष्परिणाम जाणीवपूर्वक दुर्लक्षून आपण वेगानं त्याच दिशेत पुढे जात आहोत. तिकडे अर्थशास्त्राच्या मोजपट्टया 'विकास' होत असल्याचं दाखवतात; पण प्रत्यक्ष अनुभव येत आहे तो सार्वत्रिक अध:पतनाचा _ सर्वांगीण विनाशाचा. अशा ह्या अशाश्वत, विनाशक विकासाची कारणमीमांसा करून ख-याखु-या विकासाची दिशा शोधण्याचा हा प्रयत्न. व्यक्ती, समाज आणि पर्यावरण ह्या तिन्हींची धारणा करणारा; 'भौतिक वाढी'ला असणा-या निसर्गाच्या अपरिहार्य मर्यादेचं भान ठेवून त्या मर्यादेचा आदर करणारा; जाणिवेच्या अनंत विस्ताराचा विकास अभिप्रेत असणारा असा हा 'सम्यक् विकास' आहे. संकल्पना आणि व्यवहार ह्यांची सांगड घालत त्याचा ऊहापोह करणारं हे पुस्तक.