Regular price
Rs. 146.00
Regular price
Rs. 195.00
Sale price
Rs. 146.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
मानवी जीवन हा एक प्रवास मानला तर वडीलधा-यांचे बोट धरून चालणे आले, थोरमोठयांना वाट पुसत जाणे आले. हा प्रवास कधी ’एकला चलो रे’ च्या चालीवर तर कधी मित्रांचा स्नेह आणि सहवास सोबतीला. प्रवासात कधी चढ उतार तर कधी ऊनपाऊस, तर कधी आशा-निराशेचे क्षणही. सुखदु:खाच्या या संमिश्र वाटचालीत- नियतीचा हातही वेळप्रसंगी मार्गदर्शक ठरतो. सर्जनशील विचार आणि संवेदनक्षम भावना यांचे संगमस्थान वाटेत लागले तर - मौलिक असे काही छंद आणि काही श्रद्धा मिळून जातात. वाटेत भेटलेल्या व्यक्ती, आढळलेली स्थळे, घडलेल्या घटना कधी साध्या तर कधी अविस्मरणीय. म्हणूनच... अशा व्यक्ती, असे क्षण, असे प्रसंग, अशा भावना, असे विचार, अशा घटना, अशी स्थळे, असे शब्द यांचा ऋणानुबंध म्हटले तर शब्दातीत, म्हटले तर शब्दबद्धही...