Shipping calculated at checkout.
'सनावली व घटनांच्या जंत्रीतून मांडलेला हा इतिहास नाही. भारताच्या इतिहासावर आपली ठसठशीत मुद्रा उमटवणा-या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अखेरच्या कालखंडाचा साक्षीदार असलेल्या लेखकानं झगमगत्या पर्वाचं घडवलेलं हे दर्शन आहे. पंतप्रधानांचे प्रमुख सचिव म्हणून काम करताना डॉ.पी.सी.अलेक्झांडर यांना इंदिराजींचे कितीतरी करारी व कोमल पैलू पाहायला मिळाले. नातवंडांत रमणा-या, गंमतशीर किस्से सांगणा-या, परदेश दौ-यात तळपणा-या, पंजाब प्रश्नानं सचिंत झालेल्या, राष्ट्रपतींच्या संबंधातील ताणतणाव सांभाळणा-या, मंत्रीमंडळ फेररचना अत्यंत गुप्तता बाळगणा-या व सहका-यांना सहसा न दुखावणा-या पंतप्रधान अशी त्यांची नाना रूपं इथं भेटतात. एकदा तर पंतप्रधापदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती असं अज्ञात असलेलं सत्य इथं सामोरं येतं. गंभीर-हस-या,पोलादी-प्रेमळ, मुत्सद्दी-मिश्किल अशा इंदिराजींच्या कितीतरी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. १९८० ते १९८४ या काळातील पडद्यामागील घडामोडींचा हा अस्सल, वस्तुनिष्ठ आलेख. जितका ऐतिहासिक तितकाच चकित करणारा. '