Shipping calculated at checkout.
आपल्याकडे काही अब्ज डॉलर्स आहेत आणि आपण ते गरीब लोकांच्या भल्यासाठी खर्चू इच्छित असल्याची कल्पना करा.
आपण ही रक्कम नक्की कशी खर्चू? सरकारांचे अब्जावधी डॉलर्स, हजारो स्वयंसेवी संस्था आणि विनानफा
तत्त्वांवर काम करणार्या संस्था हे सगळे गरीब लोकांचं भलं करण्यासाठी काम करतात.
त्यांचं काम मात्र गरीब लोक आणि एकंदर आपलं जग यांच्याविषयीच्या काल्पनिक संकल्पनांच्या आधारेच
नव्हे तर चुकीच्या गृहितकांवर सुरू असतं.अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डुफ्लो यांनी आपल्या पुरस्कारप्राप्त
‘पॉव्हर्टी ‘अॅक्शन लॅब’च्या माध्यमातून विकासनीतीशी संबंधित असलेल्या अर्थशास्त्रामध्ये
‘रँडमाइझ्ड कंट्रोल ट्रायल्स (आरसीटी)’ ही संकल्पना रुजवली. आरसीटीच्या वापरामुळे आणि उपलब्ध असलेल्या
पुराव्याकडे बारकाईनं लक्ष दिल्यामुळे गरीब लोकांसाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना प्रभावशाली ठरतात याची अचूकच नव्हे तर
आपल्याला धक्का देणारी माहिती मिळू शकते असं त्यांचं प्रतिपादन आहे.
गरिबीच्या खऱ्या कारणांविषयी आणि ती संपवण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी खरंखुरं
भान देणारं पुअर इकॉनॉमिक्स हे अपूर्व म्हणता येईल असं पुस्तक आहे.
वैश्विक दारिद्य्राविषयी कळकळा असलेल्या प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं पुस्तक
- स्टीव्हन डी. लेव्हिट, ‘फ्रीकॉनॉमिक्स’ या पुस्तकाचे सहलेखक