Shipping calculated at checkout.
पॅलेस्टाईन आणि इस्रायल हे शब्द ऐकले की आपल्या नजरेसमोर दृश्य येतं ते युद्ध, विनाश,
बॉम्बहल्ले, अतिरेकी नुकसान आणि मोठ्या प्रमाणातली मनुष्यहानी यांचं.
गेली जवळपास सात दशकं या दोन राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या विलक्षण संघर्षाचा
इतिहास अत्यंत आश्चर्यकारक आहे. इस्रायलच्या निर्मितीपूर्वीपासूनच पॅलेस्टिनी लोकांवर
झालेल्या अन्यायापासून आजपर्यंतच्या इस्रायलच्या अत्यंत अमानवी आणि
बेकायदेशीर धोरणांची कहाणी म्हणूनच मुळापासून समजून घेणं आवश्यक आहे.
इस्रायलनं पॅलेस्टिनी लोकांचा इतिहास बदलून टाकण्यासाठी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न
आणि त्यांना मिळालेली इंग्लंड-अमेरिका यांची साथ ही अत्यंत दुर्दैवी पार्श्वभूमी समजून घेताना
आपल्यालाही यातना होतील. दुसर्या महायुद्धापूर्वी ज्यू लोकांचा हिटलरच्या नाझीवादानं केलेला संहार
जितका निंद्य होता तितकाच निषेधपूर्ण प्रकार आता ज्यू-राष्ट्र म्हणून ओळखलं जाणारं
इस्रायल करतं आहे. या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घटनाक्रमाची सगळ्या
बाजूंनी केलेली ही तपासणी आहे. त्यामध्ये इतिहास आहे, महत्त्वाच्या घडामोडींचं रहस्य
उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठी वाचकालाही या अत्यंत ज्वलंत प्रश्नाची
खरी ओळख व्हावी यासाठीचा हा प्रयत्न आहे. चुकीचा इतिहास शिकणं हे भविष्यातही
आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतं असं म्हणतात; म्हणूनच या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी
हा एक प्रयत्न!