Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 252.00
Regular price Rs. 280.00 Sale price Rs. 252.00
Sale Sold out

Out of Stock

Shipping calculated at checkout.

Condition

फुलं झाडावर तर छान दिसतातच, पण जेव्हा ती एका ओंजळीतून दुसऱ्या ओंजळीत जातात, तेव्हा ती आणखी छान दिसतात. जी गोष्ट फुलांची, तीच विचारांचीही. मनात जेव्हा शुद्ध, सात्त्विक विचार उमलतात, तेव्हा ते त्या कुणा एका व्यक्तीला तर आनंद देतातच, पण जेव्हा ते शब्दरूप लेवून एका मनातून दुसऱ्या मनात शिरतात, तेव्हा ते अधिक प्रकाश पसरवतात, अधिक प्रेरणादायी ठरतात. जगातलं, निसर्गातलं सौंदर्य आपल्या आस्वादक नजरेनं टिपण्याची किमया साध्य झाली म्हणजे ते इतरांनाही दाखवण्याची असोशी जन्म घेते. अशाच असोशीतून एका रसिकाला स्फुरलेल्या काही ललित लेखांचं हे संकलन. हे छोटेखानी लेख म्हणजे जणू काही सोनचाफ्याची फुलंच. त्या फुलांचा सुगंध जसा मन मोहरवून टाकणारा असतो, तसेच हे लेखही सात्त्विक समाधान देणारे आहेत. चौफेर संचार करणारे, प्रेरणेच्या पणत्या पेटवणारे आणि भावविश्व समृद्ध करणारेही !

View full details