Regular price
Rs. 222.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 222.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
जयप्रकाश प्रधान व त्यांच्या पत्नीने आत्तापर्यंत तब्बल ६४ देश पालथे घातले आहेत. मात्र केवळ 'भोज्जा'ला शिवल्यासारखी त्यांची ही भटकंती नसते, तर काहीतरी वेगळं ठिकाण पाहणं, तिथली संस्कृती, रीतीरिवाज, खाणं-पिणं यांची ओळख करून घेणं याकडे त्यांचा ओढा असतो. त्यामुळे त्यांची ही भटकंती 'टिपिकल' न ठरता 'ऑफबीट' ठरते.
वैशिष्टयपूर्ण अशा ऑफबीट स्थळांची भटकंती करताना वाचकाला एका आगळया-वेगळया अनुभवाची प्रचीती येते. मग लेखकाने रंगवलेला ऑटम कलर्सचा रंगवर्षाव असो, अॅथाबास्का ग्लेशिअरवरचा अनुभवलेला थरार असो किंवा मती गुंग करणारा आउशवित्झ छळछावणीच्या भेटीतला हृदयद्रावक अनुभव असो! सर्वच प्रवासअनुभव वाचकाच्या मनाला भिडतात, एक अविस्मरणीय अनुभूती देतात. विशेष ऐकिवात नसलेली ठिकाणं उदा. नॉर्वेमधलं आइस हॉटेल, पोलंडमधील कवटया व हाडांनी सजवलेलं चर्च, व्हिएतनाममधील युध्दकाळात बांधलेली कुची टनेल्स, मेकाँग नदीतील सफर किंवा व्हिक्टोरिया फॉल्सचा अजस्त्र धबधबा...एका अद्भुत दुनियेची सफर घडवतात. या स्थळांची रंजक ओळख करून देत लेखक तिथे कसं जावं, कधी जावं याबाबतच्या उपयुक्त अशा व्यावहारिक टीप्सही देतात.
नेहमीच्याच गर्दीच्या पर्यटनस्थळांच्या प्रवासवर्णनांपेक्षा 'ऑफबीट' पर्यटनाचा रोमांचकारी आनंदानुभव देणारं पुस्तक... ऑफबीट भटकंती!