Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out

Out of Stock

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language

प्रवासवर्णनाच्या पुस्तकांमध्ये आपलं वेगळेपण जपत वर्षा-वर्षाच्या अंतराने `ऑफबीट भटकंती’ चे दोन भाग प्रसिद्ध केल्यानंतर आता प्रसिद्ध होत असलेला हा तिसरा भाग ! पहिल्या दोन भागांप्रमाणे या ति‍‌‌स‌‌‌‌‌‍र्‍या भागातही जगभरातील विविध `हटके’ व वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची विविधांगी माहिती जयप्रकाश प्रधान त्यांच्या रंजक शैलीत देतात. त्याचबरोबर या पर्यटनस्थळांना कधी जावं, कसं जावं, व्हिसा कसा घ्यावा अशी उपयुक्त माहिती आणि नकाशेही ते यात देतात.
छंद म्हणून भटकंती करता करता प्रधान दांपत्यानी तब्बल ७३ देश पालथे घातले आहेत. या भटकंतीवर आधारित अनुभवकथनाचे त्यांचे कार्यक्रमही लोकप्रिय होत आहेत. स्लोव्हाकिया, बोस्निया-हरझेगोव्हिना, कॅनेडियन रॉकीज…अशा काही परिचित/अपरिचित देशांमधील रोमांचकारी ठिकाणांमधील प्रवासअनुभवाची प्रचीती देणारं पुस्तक… ऑफबीट भटकंती-३ !

View full details