Regular price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 540.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
जवाहरलाल नेहरू. गरीब, अर्धशिक्षित, धर्मपरायण देशाचे धनाढय, उच्चविद्याविभूषित, निरीश्वरवादी पंतप्रधान. नेहरू म्हणजे एक विलक्षण रसायन. आधुनिकतेची आस, परंपरांबद्दल आस्था. मायभूमीवर निस्सीम प्रेम, इतर राष्ट्रांच्याही भल्याची आच. भावुक अन् उमदे. कविमनाचे अन् साहित्यिक पिंडाचे. बुध्दिप्रामाण्यवादी अन् वैज्ञानिक प्रगतीची ओढ असलेले. अलिप्त राष्ट्रांची चळवळ, पंचशील तत्त्वे, सुनियोजित विकासप्रकल्प, औद्योगिकीकरणाचा मजबूत पाया असे भरीव कार्य करणारे नेहरू; पण त्यांनी काश्मीर-प्रश्न राष्ट्रसंघात नेऊन देशाला एक भळभळती जखम करून ठेवली. चीनवर भाबडा विश्वास टाकून देश युध्दाच्या खाईत लोटला. नेहरूंवर अलोट प्रेम करणारी जनताही त्यांच्या या चुका नजरेआड करू शकत नाही. अनेक रसायनांच्या मिश्रणाने बनलेल्या या नवभारताच्या शिल्पकाराचे एम. जे. अकबर लिखित चरित्र आता मराठीत.