Shipping calculated at checkout.
आय.आय.टी.मध्ये प्रवेश मिळाला होता; परंतु ते तिथे शिकायला जाऊ शकले नव्हते, कारण त्यांच्या वडिलांकडे त्यांना ते शिक्षण देण्याइतके पैसे नव्हते. त्यांच्या सात मित्रांबरोबर नवी कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीकडून १०,०००/- रुपये उसने घेतले होते! क्षुल्लक कारणाने झालेल्या गैरसमजापायी एका साम्यवादी देशाच्या तुरुंगात त्यांना साठ तास कोंडून ठेवलं होतं! कॉम्प्युटरच्या दुनियेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी अहमदाबादच्या आय.आय.एम.मध्ये अत्यल्प पगारावर नोकरी पत्करली. आणि आज?... आज नारायण मूर्ती आणि त्यांच्या मित्रांची कंपनी ‘इन्फोसिस’मध्ये १,३०,००० कर्मचारी नोकरी करत आहेत आणि कंपनीचा वार्षिक नफा १,००० कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे! ह्या उज्ज्वल यशामागच्या बहुमोल जीवनाचं चित्रण ह्या पुस्तकात आहे. – आयुष्याला प्रेरणा देईल आणि मार्गदर्शन करेल, अशा ह्या पुस्तकाचं स्थान तुमच्या आयुष्यात कुठं असलं पाहिजे, ते तुम्ही ठरवायचं आहे.