Regular price
Rs. 89.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 89.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
निसर्गात सौंदर्य सामावलेलं आहे त्याचप्रमाणे मानवी शरीराचे सौंदर्य वाढवण्याचे गमकही त्यात लपलेलं आहे. निसर्गोपचारतज्ज्ञांनी विविध अन्नपदार्थांचा व वनौषधींचा नेमका वापर, घरगुती सोप्या उपायपध्दती यांचा अभ्यास करून त्याद्वारे शरीरसौंदर्यात अंतर्बाह्य आणि कायमस्वरूपी भर कशी पडू शकते, याची उकल केली आहे. कृत्रिम प्रसाधनांमुळे तात्पुरते आणि बाह्यांगी सौंदर्य वाढले तरी त्यासोबत येणारे दुष्परिणामही लपलेले नाहीत. अशा कृत्रिम उपायांना नैसर्गिक पर्याय कोणते, सौंदर्यासंदर्भातील विविध तक्रारींवर कोणते निसर्गोपचार प्रभावी ठरू शकतात, निसर्गाने बहाल केलेले सौंदर्य नैसर्गिक उपायांनी जोपासण्याचे मार्ग कोणते याची नेमकी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. 0 तजेलदार त्वचेसाठी नैसर्गिक उपाय 0 त्वचारोगांवर निसर्गोपचार 0 चमकदार डोळयांसाठी उपाय 0 डोळयांच्या समस्यांवर उपाय 0 चमकदार दातांसाठी उपाय 0 केसांची नैसर्गिक निगा 0 हातापायाची निगा 0 सुडौल शरीरासाठी उपाय 0 सौंदर्यासाठी विशिष्ट आहार 0 विविध वनौषधी 0 व्यायाम 0 योगासने