Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
ही सत्यकथा आहे एका ब्रिटिश स्त्रीची! ती पूर्व युरोपात तब्बल पन्नास वर्षं अडकून पडली. पहिल्यांदा नाझींच्या दृष्टचक्रात आणि मग साम्यवादाच्या विळख्यात! पण तिनं स्वत:च्या घरी परत जाण्याचं स्वप्न उराशी घट्ट कवटाळून ठेवलं. १९३७ मध्ये कौटुंबिक सहल म्हणून लंडनहून बल्गेरियाला निघालेली हेलन फक्त पंधरा वर्षांची होती. तिथे पोहोचली आणि काळाचं चक्र निराळ्याच गतीनं फिरू लागलं. परिस्थिती गंभीर बनली. बल्गेरियातून बाहेर पडणं मुश्किल झालं. रोजचं जगणंही कठीण बनलं होतं. तिला बल्गेरिअन माणसाशी लग्न करणं भाग पडलं. त्याच्यापासून हेलनला चार मुलं झाली. भुकेल्या, थंडीनं गठाळलेल्या मुलांबरोबर सतत आसरा शोधत फिरणं नशिबी आलं. समोर कष्टांचा डोंगरच होता. हेलननं मात्र धीर सोडला नाही. परिस्थितीच्या तडाख्यांना तोंड देत तिनं मुलांना वाढवलं. १९८९ मध्ये बर्लिनची भिंत पडली. स्वगृही जाण्याचं हेलनचं स्वप्न पुरं होण्याची वेळ जवळ आली होती. तिनं लिहिलेल्या आठवणी हृदयद्रावक आहेत... पण ही गोष्ट आहे तिच्या धीराची, आशावादची आणि पराभव अमान्य करणा-या तिच्या कणखर मनाची!
Share
