Skip to product information
1 of 2
Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

PUBLISHER
AUTHOR
LANGUAGE
छातीला कळ येत होती आणि शेवटच्या क्षणी औरंगजेब त्याच्या मुलीला झीनतला म्हणतो की , ' इस्लाममें पुनर्जन्म नहीं मानते , पर फिर भी कभी खुदा के करम से हम वापिस इन्सान की जात में पैदा हुए तो हम इन पहाड़ो से औऱ मराठों से लड़ने नही आयेंगे , कभी नहीं ...' बादशहाचा आवाज थांबला. असा पुस्तकाचा शेवट होतो आणि आपण स्तब्ध होतो... महाराजांना आठवत. आयुष्यभर मराठ्यांशी युद्ध करणारा हा सुलतान मराठ्यांविषयी मनात नेहमी आश्चर्य ठेवूनच होता. छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करतांना औरंगजेब कसा होता , हेदेखील वाचायला हवं हे नक्कीच तेव्हा आपल्याला ह्या राजाची महती समजायला मदत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी छेडलेली जग हि आशिया खंडातील सगळ्यात सामर्थ्यवान सुलताना विरुद्ध होती, तो सुलतान क्रूर होता, कपटी होता, धूर्त होता, हुशार होता, द्रष्टा होता ह्या सोबतच भयंकर महत्वाकांक्षीही होता. थंड रक्ताचा आणि धोरणी मेंदूचा होता, लोभी होता, पण फकीराप्रमाणे राहायचा, धर्मवेडा किंवा धर्मांध` नव्हता, पण धार्मिक वर्तन करून लोकांना भावनिक करण्याचे अद्भुत कसब त्याच्याकडे होते. त्याच्या ह्या सर्व गुणांचा वापर करून त्याच्या इतक्याच ताकदीच्या सगळ्या शत्रूना संपवून तो मुघल तख्तावर बसला खरा, पण स्वतःला नियंती म्हणजेच मुकदर समजणारा हा सुलतान अखेर स्वतःचे मुकदर लिहू शकला नाही. ह्या कुशाग्र बुद्धी असलेल्या मुघल साम्राज्यातील बादशाहबद्दलचे हे पुस्तक महाराजांच्या निधनानंतर सुद्धा तब्ब्ल २६ वर्षे मराठे तळहातावर शिर घेऊन ह्या क्रूर सुलतानाशी लढले. त्या पराक्रमाची आठवण म्हणजेच औरंगजेबाची ही चरित्रकथा.
View full details