Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language

‘‘दूर कुठेतरी एका कोपऱ्यात अभिजनांचा टिचभर तुकडा आणि दुसरीकडे हा बहुजनांचा अक्राळविक्राळ प्रदेश. मी त्याच्या मध्यावर कुठेतरी उभा… अगदी एकटा. न घर का, न घाट का!’’– ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ कथेतून—
गेली ३५हून अधिक वर्षं ज्येष्ठ लेखक सतीश तांबे निष्ठेने कथालेखन करून ‘कथेचा चिंचोळा अवकाश’ सातत्याने विशाल करत आहेत. मुठीत काजवा लपवलेला असावा, तशी त्यांच्या कथेत मर्मदृष्टी दडलेली असते आणि जेव्हा ती वाचकाला सन्मुख होते, तेव्हा वाचक चकित होऊन अंतर्मुख होतो.या संग्रहातली ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ ही कथा मराठी साहित्याची सांस्कृतिक चिकित्सा करते. तर ‘यत्र-तत्र-सावत्र’ ही कथा जमिनीच्या रूपकातून केलेलं मानवी अवस्थेवरचं करुण भाष्य ठरते. ‘नाकबळी’सारखी मिश्कील वाटणारी कथा गंभीरपणे स्त्रीपुरुष संबंधांचा वेध घेते. तर ‘संशयकल्लोळात राशोमान’ ही कथा सत्य म्हणजे काय, या प्रश्नाचा रहस्य कथेच्या अंगाने वेध घेते. ‘रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा’ ही कथा म्हणजे जणू कल्पित कसं रचावं याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या आपल्या महाकाव्यांना वाहिलेली आदरांजलीच


View full details