Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'रक्ताच्या नात्याचा संबंध देखील उरला नाही, अशा घराच्या रगाड्याला जुंपलेली ती आहे सत्तर वर्षांची निपुत्रिक बालविधवा. तिला कादंबरीची नायिका तरी कसे म्हणायचे! आहे खरी कथाभागाच्या वेंâद्रस्थानी. उसन्या नातेवाईकांच्या मुला-बाळांना मायेच्या घट्ट धाग्यांनी जखडून ठेवणारी. शेतीला जखडलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ससेहोलपट, त्यामुळे नव्या-जुन्या पिढ्यांमध्ये होणारी घुसमट, वंशसातत्याची सनातन आस, पुरुषी संस्कृतीने स्त्रियांच्या व्यापक सर्जनशीलतेकडे फिरविलेली पाठ आणि उच्चकुलीनतेचा टेंभा मिरविणा-या घराण्याच्या अंधा-या तळघरातील अज्ञात रहस्ये अशा विविध स्तरांवर वावरणा-या व-हाडच्या पाश्र्वभूमीवरील या बहुपदरी व गुंतागुंतीच्या कादंबरीत तसे अनेक नायक व नायिका सापडतील. मग या वृद्धेलाच नायिका का करू नये? तिनेच आपल्या कर्तृत्वाने व निष्ठेने या घराण्याच्या परंपरा जपून त्यांना नवी वळणे दिली आहेत. अखेर प्रत्येक घरातील वैशिष्ट्यपूर्ण कुलसंस्कृती, आचार-विचार व स्वयंपाक-संस्कृती देखील डोळ्यात तेल घालून जतन करतात व त्यात भर घालतात त्या परक्या घरातून आलेल्या स्त्रियाच ना! '
Share
