Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Condition

कडव्या दहशतवाद्यांचा नायनाट घडवला रणरागिणी झालेल्या स्त्रियांनी ! त्यांच्या मदतीला होती विशिष्ट किरणं आणि विशिष्ट घुबडं ! * सर्जिकल स्ट्राईक एक दुर्मीळ वनस्पती. तिच्या फळांचा रस पिऊन जन्माला आला एक राक्षस ! काय होती या राक्षसाची करणी ? * राकेस करणी जिवंत माणसाची हत्या करून त्याच्या व्यक्तिमत्त्वासकट अन् स्वभाववैशिष्ट्यांसकट त्याचं रंगरूप साकारणारा परग्रहवासी यंत्रमानव. त्याच्या हल्ल्यापासून पृथ्वीवासीयांचा बचाव झाला का ? * फॉलसोबो कर्णानं दान केली आपली कवचकुंडलं. आज आपलं हृदय कोणी दान करील का ? मानवी हृदयाप्रमाणे काम करणारं कृत्रिम हृदय बनवता येईल का ? * कार्डीओ – ७७ दहशतवादाशी लढा देणारा कृत्रिम काजवा ! पोलीसयंत्रणेला अन् लष्कराला त्याची मदत झाली का ? * फायर फ्लाय ॲक्शन मरणासन्न अवस्थेतील प्रियकर कोमामध्येही आपल्या प्रेयसीबरोबरचं जीवन जगतो. मात्र सत्य समजल्यानंतर तो धक्कादायक निर्णय घेतो. काय होतं ते सत्य ? कोणता होता त्याचा निर्णय ? * मिरॅकल हुबेहूब माणसाप्रमाणे दिसणारे यंत्रमानव माणसाची सर्व कामे चोख करत आहेत. माणसाला त्यांची सर्व प्रकारची मदत मिळत आहे. हा आहे येणारा भविष्यकाळ ! * गुरूमहाराज विज्ञान-तंत्रज्ञान आज मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूचं अविभाज्य अंग झालं आहे. आजच्या विज्ञानाच्या पायावर भविष्यातील विज्ञानकल्पनेचा महाल उभारणार्याय - मानवी भावभावनांचा, परस्परसंबंधांचा वेध घेणार्या - उत्कंठावर्धक, चित्तथरारक अन् रंजक विज्ञानकथांचं सप्तरंगी इंद्रधनुष्य !

View full details