Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
कोरोना काळात आपण सर्वांनीच मोठं स्थित्यंतर अनुभवलं. अजूनही ते वादळ शमलेलं नाही, पण तरीही आपल्याला आपल्या दिनक्रमाकडे वळायलाच हवं. यंदाच्या आमच्या मेहता मराठी ग्रंथजगतच्या दिवाळी अंकात कोरोनाने आपल्या जगण्यावर केलेला प्रभाव अर्थातच अनुभवास येणार आहे. मुख्यतः कोरोना काळातलं सृजन या भागात काही कलाकार, साहित्यिक आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आपले अनुभव आणि नव्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करतील. यात प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या कोरोना काळातील दोन सिनेमांच्या निर्मितीचा अनुभव, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, समीक्षक रणजित शिंदे, अनुवादक उमा कुलकर्णी यांचे अनुभव, अशा दिग्गजांच्या लेखांचा समावेश असेल. शिवाय या अंकात देशातल्या आणि जगातल्याही विविध भागात स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांचे कोरोना काळातले अनुभव, त्यांचं महाराष्ट्राशी असलेलं जोडलेपण आणि कोरोनामुळे आलेली अस्वस्थता याविषयीच चिंतन असेल. या अंकात विज्ञान कथा आणि वैज्ञानिक साहित्यावरही भर देण्यात येत आहे. संजय ढोले, बाळ फोंडके यांच्या कथांचा आस्वाद या भागात घेता येईल. तर जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचवा.
Share
