Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या चित्राची निर्मिती ज्या प्रसंगी झाली, त्याचे केलेले वर्णन.. एका उत्कृष्ट चित्रकाराकडून.. एक असा व्यक्ती जो शिवाजी महाराजांना भेटला, त्यांची चित्रे काढली.. पण आजही इतिहासाच्या पानांमध्ये हरवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समकालीन चित्रांचा, त्यांच्या राजयोगी व्यक्तिमत्वाचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे घेतलेला मागोवा म्हणजेच मऱ्हाठा पातशाह. छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे ? त्यांचं बोलणं कसं असेल ? खाजगी आयुष्यात त्यांचा वावर कसा असेल ? असे एक ना अनेक प्रश्न कदाचित आपणा सर्वांनाच पडतात. केतन पुरी यांनी अतिशय मेहनतीने आणि संशोधन पूर्व लिहिलेलं ‘मऱ्हाटा पातशाह’ हे पुस्तक आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यास समर्थ आहे. या पुस्तकात समकालीन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लेखक, इतिहासकार, प्रवासी, चित्रकार, व्यापारी व सैन्य अधिकारी ( जे प्रत्यक्ष महाराजांना भेटले आहेत) यांनी महाराजांचं केलेलं वर्णन केतनने बारकाईने अभ्यासून या पुस्तकात समाविष्ट केलेलं आहे . महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रकारांनी महाराजांची काढलेली दुर्मिळ व महत्वाची चित्रे आणि त्या चित्रांच्या आधारे केतनने केलेलं विश्लेषण छत्रपती शिवाजी महाराज यांची हुबेहूब प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी करण्यास मदत करतात. तसेच,हि सर्व चित्रे आणि ऐतिहासिक दस्तऐवज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वाचे अनेक महत्वाचे पैलू उलगडतात. छत्रपती शिवाजी महाराज यांची वास्तववादी प्रतिमा आपल्या समोर उभी राहते. शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासतांना महाराज कसे असतील याचे उत्तर म्हणजे ‘मऱ्हाटा पातशाह’