Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
वनस्पती म्हणजे काय, वनस्पतीचं काम कसं चालतं ते या पुस्तकात सांगितलं आहे. वनस्पतिशास्त्र शिकवणारी पाठयपुस्तकं असतात. पाठयपुस्तकात वनस्पतीचे विविध भाग, वनस्पतीची वाढ, वनस्पतीमधल्या विविध प्रक्रिया इत्यादी गोष्टी सांगितलेल्या असतात. पाठयपुस्तकातला मजकूर फक्त विद्यार्थ्यांसाठीच असतो. झाड आणि माणूस या पुस्तकातला मजकूर वर्गात न जाता कळणारा आहे. शाळा, फळे, भिंती, मास्तर, परीक्षा, पास, नापास इत्यादी गुंत्याच्या बाहेर राहून वनस्पतीशी मैत्री करण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे. हे पुस्तक वाचून वनस्पतीची गंमत कळते. या पुस्तकाची दुसरी गंमत अशी की यातल्या मजकुराला एक स्वतंत्र शैली आहे. या मजकुरात माणसं आहेत, प्रसंग आहेत, घटना आहेत, किस्से आहेत आणि अर्थातच शास्त्राचा आधार असलेली माहिती आहे. म्हटलं तर ही गोष्ट आहे. म्हटलं तर ही पत्रकारिता आहे. म्हटलं तर हे शिक्षणही आहे. ज्ञान आहे आणि गंमतही आहे. कथा, कादंबरी, पत्रकारिता, शिक्षण इत्यादी हेतूंसाठी तयार केल्या जाणाऱ्या मजकुराचे साचे ठरलेले आहेत. शैल्या ठरलेल्या आहेत. मजकुरांची साचेबंद शैली सवयी दूर सारून लेखक वाचकांशी बोलला आहे.