Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 126.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 126.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
‘कोणाही व्यक्तीच्या त्यानं हाती घेतलेल्या योजनांवरच्या आणि कार्यप्रणालीवरच्या विश्वासाची कसोटी केव्हा लागते? जेव्हा त्याच्या दृष्टीपुढं पसरलेलं संपूर्ण क्षितिज संपूर्णतया अंधारानं हरवून गेलेलं असतं, तेव्हा !’ हे विधान आहे महात्मा गांधींचं. अशा तहेचे अनेकानेक प्रसंग जॉ. किरण बेदींवर अनपेक्षितपणे कोसळले आहेत आणि प्रत्येकी वेळी तो गहन गंभीर, निबिड अंधकार भेदून किरण त्यातून सुखरूप पार पडल्या आहेत. ‘मजल...दरमजल’ या नव्या छोट्याशा आत्मपर पुस्तकात आपलं कर्तव्य कठोर निष्ठेनं पार पाडताना कोणकोणत्या अडचणींशी सामना करावा लागला, याचं डॉ. किरण बेदी यांनी मोजक्या आणि नेमक्या शब्दांत विवरण केलं आहे. स्वत: शिल्पकार असलेल्या जोजफ बोएज यांच्या नावानं चौदा हजार डॉलर्सच्या ‘सामाजिक मूर्तिकार’ पुरस्कारानं २२ ऑक्टोबर, १९९७ रोजी डॉ. किरण बेदी यांना सन्मानित करण्यात आलं. आपल्या वैयक्तिक क्षमतांचं सुयोग्य पालनपोषण आणि कलात्मक पद्धतीनं सांभाळ करू शकणाया व्यक्तीच समाजात आदर्श मूर्ती घडवू शकतात. प्रसिद्ध तिहार तुरुंगात डॉ. किरण बेदींनी हेच तर केलं. अपारंपारिक पद्धतीनं सर्जनावर आपली धारदार दृष्टी रोवून सातत्यानं प्रयत्नशील राहत त्यांनी कळतनकळत जोजफ बोएज यांच्या गृहीताला प्रत्यक्षात अर्थपूर्ण रूप दिलं. निराशा, औदासीन्य आणि विषाद यांनी पोखरल्यामुळं मनातून विध्वस्त झालेल्या तिहारमधील कैद्यांमध्ये चैतन्याचे स्फुलिंग पेटवणाया डॉ. किरण बेदींचं हे अनुभवकथन त्यांच्या ‘आय डेअर’ आणि ‘इट्स ऑल्वेज् पॉसिबल’ या त्यांच्यासंबंधीच्या आधीच्या पुस्तकांप्रमाणेच वाचकांना विचारप्रवर्तक वाटेल, अशी आमची खात्री आहे.
View full details