Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 144.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्यलढयाचे नेतृत्व तर केलेच; पण स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी, याबद्दलही वेळोवेळी ते मार्गदर्शन करीत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये संमत झालेल्या अनेक ठरावांमध्ये गांधीजींच्या विचारांचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले आढळते. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली जी राज्यघटना तयार करण्यात आली, ती मात्र गांधीवादी विचारसरणीशी फारशी सुसंगत आहे, असे म्हणता येत नाही. असे का झाले असावे? महात्मा गांधी आणि त्यांचे वारसदार असणारे पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांमध्येच मूलभूत मतभेद का होते? ती मतभिन्नता कशा बाबतीत होती? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देता देता भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा इतिहासही उलगडून दाखवणारे एका ज्येष्ठ न्यायविदाचे हे पुस्तक... गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका आगळया पैलूवर अधिक प्रकाशझोत तर टाकतेच; पण काही मूलभूत राष्ट्रीय प्रश्नांचा पुनर्विचार करण्यास वाचकांना प्रवृत्तही करते. 
View full details