Regular price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 153.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
महाभारताला इतिहास म्हणावे तर ते पुराण वाटते आणि पुराण म्हणू जावे तर ती राजघराण्याची कहाणी वाटते. एक कथा म्हणून त्याचे मूल्यांकन करावे तर ते विलक्षण असामान्य काव्य वाटते आणि काव्याच्या भिंगातून त्याच्याकडे पाहिल्यास तो दर्शनशास्त्राचा ग्रंथ आहे असे प्रतीत होते. पहिल्या दृष्टिक्षेपात महाभारताचे शास्त्रीय रूप फसवे भासले, तरी त्याचे सौंदर्यही त्याच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण असण्यातच आहे. महाभारतात ज्या धर्माचा बोध आहे, ज्या धर्माचे प्रयोजन आहे त्या धर्माची एखाद्या मंदिराच्या आकारात कल्पना केली तर त्या मंदिराच्या चार भिंतींवर चार वेगवेगळ्या धर्मपुरुषांचे दर्शन होते. एका भिंतीवर कर्मयोगी श्रीकृष्ण धर्माचे अगदी अभिनव रूप धारण करून उभे आहेत. दुसया भिंतीवर कर्मवीर भीष्म उभे आहेत. भीष्मांच्या धर्मतत्त्वात अवगाहन करणे म्हणजे आकाशाला मापण्यासारखे होईल. तिसया बाजूला उभा आहे कर्मानुरागी युधिष्ठिर. युधिष्ठिर स्वत:च धर्माचा अंश आहे. चौथ्या भिंतीवर मात्र साक्षात धर्म स्वत:च उभा आहे, हा धर्म म्हणजेच कर्मसंन्यासी महामना विदुर! महाभारताबद्दल मधूनमधून सारखे लिहिले जात आहे आणि यापुढील काळातही लिहिले जाईल. त्याचे कारण प्रत्येकवेळी नव्याने वाचताना महाभारताचे प्रत्येक पात्र, प्रत्येक घटना सूर्योदयाप्रमाणे, भरतीच्या लाटांप्रमाणेच नव्या रूपाचे, नव्या रंगाचे, स्वच्छ, निरभ्र आकाशासारखे दर्शन घडवत मर्मज्ञांपुढे हजर होते.