Regular price
Rs. 146.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 146.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
'हा आहे एका चिरंजीव मैत्रीचा प्रवास. म्यूझिक क्लासमधल्या बाकावर सुरू झालेला आणि पाच दशके फुलत गेलेला. मित्रांच्या या जोडीतले कुमार गंधर्व आपला चिरतरुण, सदाबहार स्वर मागे ठेवून अनंताच्या प्रवासाला गेले असले; तरी या मैत्रीचा प्रवास चालू आहे. डॉ. चंद्रशेखर रेळे यांच्या मनात तो रुणझुणतो आहे. असंख्य स्वरांनी, आठवणींच्या हिंदोळयांनी, स्मरणातून उमटणा-या चित्रपटांनी आणि कुमारांच्या आजही होणा-या अलौकिक स्पर्शांनी. दोस्तीचा हा विलक्षण ऐवज डॉ. रेळे आता वाचकांच्या स्वाधीन करत आहेत. भारतीय संगीतातल्या दोन दिग्गजांच्या या वाटचालीत आता वाटसरू होत आहेत मराठी वाचकही... कुमार माझा सखा! '