Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
ऊसाच्या फडात जाऊन अंगभर जखमा घेत ऊस तोडताना मासिक पाळीच्या काळात चार दिवस रोजगार बुडू नये, भाकरी गुडघ्यात मान घालून बसू नये म्हणून कोक म्हणजे गर्भाशयच काढून, त्यासाठी भरमसाट पैसा खर्च करण्याची आणि प्रसंगी जीवघेणी जोखीम पत्करण्याची एक साथ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आली आहे, रोगासारखी ही साथ पंधराएक हजार महिलांपर्यंत पसरली. भाकरी आणि रोजगार यांच्यामध्ये गर्भाशय गतिरोधकासारखं उभं आहे, असं काही ऊसतोडणी महिला मजुरांना वाटतंय. शिवाय चार दिवस अस्पृश्य होऊन झोपडीबाहेर बसावं लागतंय. गर्भाशय नवनिर्मितीचं ठिकाण नसून एक अडसर आहे, अशी त्यांची धारणा झालीय किंवा व्यवस्थेनं तशी व्हायला भाग पाडलंय, भाकरी मिळवण्याच्या लढाईत खंड पडू नये म्हणून हा कोक काढून टाकला जातोय. ऊसतोडणी करणाऱ्यांच्या टोळीलाच ‘कोयता' असं नाव पडलंय आणि गर्भाशयाच्या अनेक पिशव्या जणू काही कोयत्यांच्या धारदार टोकाला लटकत आहेत.