Regular price
Rs. 117.00
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 117.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
बाबू चांगलाच कर्जबाजारी झाला. तवनाप्पाचे घेतलेले दहा हजार रुपये कशानं फेडायचे हे कळेना झालं. अखेर यावर पंचाईत बसली आणि सगळ्यांंनी मिळून असं ठरवलं, बाबूनं हे हॉटेल कर्जापोटी तवनाप्पाला लिहून द्यावं आणि तवनाप्पानं त्यात आपलं कर्ज वळतं करावं, इतरांचीही देणी भागवावीत आणि एकदोन हजार रुपये बाबूला रोख द्यावेत. पंचाईतीत ठरल्याप्रमाणं सगळ्या गोष्टी नमूद करून पक्का कागद केला. रोख रुपये दोन हजार घेऊन खुशखरेदी लिहून दिली. हॉटेलची मालकी तवनाप्पाकडे आली. सगळ्या फर्निचरसह, सगळ्या वस्तूंसह हॉटेल ताब्यात देऊन बाबू मोकळा झाला. कुणाच्यातरी व्यवस्थेखाली `स्वल्पविराम` हॉटेल तवनाप्पा चालवू लागला आणि बाबूनं रोख मिळालेल्या पैशात जवळच दुसरं हॉटेल खोललं. असे आठ पंधरा दिवस गेले आणि गावात जे अतिशहाणे चार लोक होते, त्यांनी एक नवीच शक्कल काढली. त्यांनी तवनाप्पाला शिकवलं – ``तू हॉटेल घेतलंस, पन बाई का सोडलीस?``