Shipping calculated at checkout.
विज्ञानात कुणी छोटा-मोठा, खालचा-वरचा नाही. नवीन कल्पनांचा झरा कुठेही फुटू शकतो. न सुटणारी कोडी एखादा पोरच सोडवून जातो. विज्ञानाचा प्रवाह कुठूनही कुठेही वाहू शकतो. वैज्ञानिकांनी, प्राध्यापकांनी, विज्ञानलेखकांनी विज्ञानशिक्षण शिकवायचं, लोकांसमोर मांडायचं आणि विद्यार्थ्यांनी, सामान्य वाचकांनी त्यांच्यापासून फक्त शिकायचं – या समजुतीला जोरदार तडा देणा-या अनुभवांचं हे कथन. विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी, आदिवासी, अशिक्षित माणूसही संशोधन करू शकतो, ज्ञान-विज्ञानात मोलाची भर टाकू शकतो. हे केवळ इतिहासातच घडलं आहे असं नाही; तर आजही नित्य नेमानी घडू शकतं, घडत आहे. मोठमोठ्या उपकरणांनी समृद्ध प्रयोगशाळा असतात विद्यापीठे अन् संशोधनसंस्थांमध्ये. सामान्य माणसाची प्रयोगशाळा आहे ‘कट्टा’. प्रत्येकाला सर्वकाळ आणि सर्वत्र उपलब्ध असलेली. अशा ‘कट्टा’ प्रयोगशाळेतून विज्ञानक्षेत्र अधिक निकोप आणि लोकाभिमुख करणारे –