Skip to product information
1 of 1

Bookvariety

Kase Banale Shaikshanik Sahitya

Kase Banale Shaikshanik Sahitya

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Author
Publication
Language

ज्ञानाची शिकवण, साठवण आणि त्याचे दळणवळण मानवाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचं असतं. शैक्षणिक साहित्याचं योगदान यासाठी मोलाचं आहे. खडू-फळा, पाटी-पेन्सिल, कागद-पेन ते संगणकापर्यंत बहुविध शैक्षणिक साधने विद्यार्थी व शिक्षक या दोघांनाही अध्ययन व अध्यापनाकरिता आवश्यक ठरतात. त्यांचा इतिहासही तितकाच रंजक आहे. त्यांचे शोध. निर्मिती, त्यांतील विज्ञान, त्यांचा वापर आणि त्यांच्या निवडीसाठीचे निकष कळाल्यास या साधनांविषयी जवळीक निर्माण होते. त्यांच्यातील योग्य बदल-आधुनिकता, सुलभता, अध्यापन व अध्ययनासाठी अधिक प्रभावी ठरत आहे. या प्रभावी शैक्षणिक साहित्याच्या रंजक कहाण्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना वाचाव्या वाटाव्या इतक्या आकर्षक आहेत. सर्वच शैक्षणिक साहित्याचे एकत्रित ललित । वाङ्मय-प्रकारातील हे कहाणी रूपाने मांडलेले आणि सर्व बाबींचा रंजक पद्धतीने या पुस्तकातून अभ्यास व्हावा या उद्देशाने लिखाण झालेले हे पुस्तक.

View full details