Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
नोबेल पारितोषिक विजेते परमपूज्य दलाई लामा प्रथमच या पुस्तकाच्या माध्यमातून जगभरातील बालकांशी संवाद साधत आहेत. यात बालपणीच्या संस्कारातून त्यांच्यात रूजलेल्या करुणा आणि शांततेचे परिपाठ गोष्टरूपात अनुभवास येतील. आजच्या घडीचं जगातील सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे चौदावे दलाई लामा. अर्थात बालपणीचे तिबेटातल्या छोट्याशा गावातले ल्हामो थोन्डूप. त्यांची आई म्हणजे करुणेचे परिपाठ देणारा सर्वात महान गुरू. आईकडून घेतलेली ही शिकवणच दलाई लामा आपल्या छोट्या वाचकांना या पुस्तक रूपाने सांगत आहेत. सहजसोपी शब्दकळा आणि सामर्थ्यवान आशयातून दलाई लामा परस्परांप्रति करुणामय भाव बाळगण्याची वैश्विक शिकवण देत आहेत. बाओ लू यांच्या नितांत सुंदर रंगछटांनी हे पुस्तक सजले आहे. जगाच्या वाढत्या गोंधळाच्या स्थितीवर हे पुस्तक दयाभाव वृद्धिंगत करणारा मार्गदर्शक ठरेल.
Share
