Regular price
Rs. 250.00
Regular price
Rs. 333.00
Sale price
Rs. 250.00
Unit price
/
per
Out of Stock
Shipping calculated at checkout.
औषधं आपल्या सर्वांनाच कधी ना कधी घ्यावी लागतात. पण औषधं तयार होण्यामागचा खटाटोप आपल्याला माहीत नसतो. सुरेश कारे हे इंडोको रेमेडीज या औषध कंपनीचे प्रमुख. लहानपणापासून घरात औषधांच्या आसपासच ते वाढले. ‘‘आमच्या औषधांमुळे लोकांना बरं वाटू दे’’, अशी प्रार्थना करत लहानाचा मोठा झालेला सुरेश कारे नावाचा मुलगा आज इंडोको या पाचशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपनीचा प्रमुख आहे. इंडोको ही भारतातली एक अग्रगण्य औषध कंपनी बनली ती वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सुरेश कारे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे आणि कल्पकतेमुळे. सुरेश कारे यांच्या स्वयंस्फूर्त कर्तृत्वाचा आलेख रसिल्या शब्दांमध्ये मांडणारं ‘कारेनामा’ हे पुस्तक उद्योजकता व कल्पकता यांच्या जोरावर भरारी घेणार्या एका माणसाची कहाणी सांगतं. गोव्याच्या प्रसन्न आणि निर्मळ संस्कृतीचा वारसा घेऊन आलेल्या सुरेश कारे यांच्या जडणघडणीचा हा प्रवास वाचकांना नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.