Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
ही कादंबरी वर्तमान राजकारणाच्या वास्तवाला सोलून काढते. स्वातंत्र्योत्तर राजकारण स्वप्नाळू होते, पण विषाक्त नव्हते. विद्यमान राजकारण हे जातीजातींत, धर्माधर्मांत तंटे-बखेडे निर्माण करणारे आणि अराजकतेच्या दिशेने वेगाने जाणारे आहे. त्यामुळे देश अन् समाजाच्या एकसंधतेला तडे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे राजकारण भयावह होण्याची शक्यता बळावते. अभिव्यक्ती अन् मतस्वातंत्र्य नाकारले जाणे, ही हुकूमशाहीच्या पावलांची नांदी असू शकते. राजकुमार बडोले यांनी विद्यमान राजकीय पट सिद्धहस्त लेखकाच्या प्रज्ञेने मांडला आहे. प्रज्ञावंत हा जुलमी व्यवस्थेचा कधीही बटीक नसतो. मानवाच्या मुक्तीचे हुंकार त्याच्या अभिव्यक्तीत असतात. मानवी प्रतिष्ठेची जोपासना ही त्याची अभिलाषा असते. मनुष्याचे स्वयंभूत्व ही त्याची प्रार्थना असते. ही कादंबरी मानवमुक्तीचा गजर करते. राजकुमार बडोले यांनी प्रत्यक्षपणे अनुभवलेले सत्ताकारण आणि सामान्य माणसाला जाणवणारी भारतीय व महाराष्ट्रीय राजकारणाविषयीची संवेदनशून्यता ठसठशीतपणे या कादंबरीतून व्यक्त होते. डॉ. ऋषीकेश कांबळे
Share
