Out of Stock
Shipping calculated at checkout.
राज्यात जवळपास २०० साखर कारखाने….ऑक्टोबर ते एप्रिल असा ६-७ महिन्यांचा गळीत हंगाम ….त्या काळात कारखान्यातील परिसरात ऊसाच्या फडांवर लाखो मजूरकुटुंब पोटापाण्यासाठी आपली घरं, शेती, गावं सोडून येतात. या हंगामात स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या आरोग्य समस्या, मुलांच्या शिक्षण समस्या, आर्थिक समस्या असे अनेक गंभीर प्रश्न या स्थलांतरित मजुरांसमोर आ वासून उभे असतात. जीवनकोंडीच जणू! याच समस्यांचा सखोल अभ्यास गेल्या ५ वर्षांत टाटा ट्रस्टस्तर्फे ‘टीम आशा’ने सोमेश्वर साखर कारखाना परिसरात केला. त्या आधारेच अनेक जटील प्रश्नांची चर्चा या पुस्तकात केलेली आहे.शिक्षण, कामगार, मानव अधिकार, शेती अशा क्षेत्रांतील कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत आणि धोरणकर्ते यांच्यापर्यंत हा विषय पोचवून ऊसतोडणी मजुरांची जीवनकोंडी सुटावी यासाठीच हा एक विधायक प्रयत्न….