1
/
of
1
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
जनहितयाचिका म्हणजे काय? अनधिकृत बांधकामे करणा-या बिल्डर्सच्या मनमानी कारभाराला आळा घालता जावा, असे वाटत असल्यास...नदीच्या पाण्यात घातक रसायने सोडणा-या बेजबाबदार कंपन्यांना अद्दल घडावी, असे वाटत असल्यास...एखादा चित्रपट वा दूरचित्रवाणी मालिका आक्षेपार्ह असल्यामुळे त्यांच्या प्रदर्शनावर बंदी आवश्यक वाटत असल्यास.. तुरुंगातील कच्च्या कैद्यांना न्यायाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे खितपत पडावे लागू नये, असे वाटत असल्यास... महिला कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून लैंगिक छळाला तोंड द्यावे लागू नये, असे वाटत असल्यास.. कुणाही भारतीय नागरिकाला वा संघटनेला जनहितयाचिकेद्वारे अशा प्रकरणांत उच्च न्यायालयांत किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. वैयक्तिक स्वार्थासाठी जरी अशी कोणतीही याचिका करता येत नसली, तरी सार्वजनिक हितरक्षणासाठी मात्र हा मार्ग कुणालाही अनुसरता येतो. जनहितयाचिकेच्या या अभिनव मार्गाची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्याबद्दलच्या कायदेशीर तरतुदींपासून संभाव्य दुरुपयोग टाळण्यासाठी घ्यावयाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती असंख्य उदाहरणांसह देणारे हे संग्राह्य पुस्तक...
Share
