Shipping calculated at checkout.
'जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ हा मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हणून ओळखला जात असला, तरी त्याच्याबद्दल अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. मराठ्यांचे राज्य लयाला गेल्यानंतरच्या काळात सातारला त्याने बजावलेली प्रशासकीय कामगिरी तर दुर्लक्षितच राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द इंग्लंडमधील अस्सल कागदपत्रांचा धांडोळा घेऊन लिहिलेले हे त्याचे चरित्र खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. मराठ्यांचा इतिहास लिहिण्यामागच्या डफच्या मूळ प्रेरणा, तो इतिहास लिहिताना त्याला आलेल्या अडचणी, साधनसामग्री गोळा करण्यासाठी त्याने घेतलेले अपार कष्ट आणि तरीही प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना इतिहासकार म्हणून त्याच्या लेखनाला पडलेल्या मर्यादा व राहिलेल्या उणिवा... हे सारे काही स्पष्ट प्रकाशझोतात आणणारे हे चरित्र मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आस्था असणा-या सर्वांनीच अवश्य वाचले पाहिजे. '