Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
विषमतावादी व्यवस्थेने वर्गा बाहेर बसून शिकायला लावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी एकाच ज्ञान शाखेचा नव्हे तर विविध ज्ञानशाखांचा अभ्यास करतात, त्यात पारंगत होतात. २२ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पदव्या ते प्राप्त करतात. पुढे भारतात येऊन या देशाचे संविधान लिहितात आणि सर्वाना न्याय देतात, हे शून्यातून सुरुवात करणारे आणि जग जिंकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखक जगदीश ओहोळ यांनी 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकातून मांडले आहेत, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाने वाचले पाहिजेत आणि आत्मसात केले पाहिजेत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगाला आदर्श आहेत. ते ग्लोबल बाबासाहेब आजच्या नव्या पिढीला समजले पाहिजेत. ते ग्लोबल बाबासाहेब सांगण्याचे काम लेखक जगदीश ओहोळ यांनी या 'जग बदलणारा बापमाणूस' पुस्तकातून केले आहे
Share
