Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
इंटरनेट ही सा-या जगाला हाकेच्या अंतरावर आणणारी मानवी बुध्दीची स्तिमित करणारी झेप आहे. मानवी भावविश्वाचा कायापालट करणारी ती अपूर्व किमया आहे. शिक्षण, संशोधन, मनोरंजन आणि व्यापार चर्चा, गप्पा आणि इलेक्ट्रॉनिक पत्रव्यवहार शॉपिंग, परिसंवाद बातम्या आणि ज्ञानभांडार ग्रंथ,कोश, काल्पनिक विश्वातील सफर आणि वैद्यकीय उपचार. इंटरनेटवर काय नाही ? सारं सारं काही इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. सारी मानवजात इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चालली आहे. अशा या महान क्रांतीकारी इंटरनेटची ही नुसती झलक आहे. एकविसाव्या शतकातील मानव इंटरनेटमध्ये पूर्ण गुरफटेल. इंटरनेट त्याचं सारं जीवनच पार बदलून टाकील. हा चौखूर उधळलेला विज्ञानवारू मानवाला कुठे बरं नेईल ?