Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
मराठी साहित्यातील अगदी आरंभीच्या काळात कथालेखन करणाया प्रमुख लेखकांच्या उत्तम कथांचा वि. स. खांडेकर यांनी संपादित केलेला हा प्रातिनिधिक संग्रह आहे. या कथाकारांत हरि नारायण आपटे, दिवाकर कृष्ण, वि.स. सुखटणकर, य. गो. जोशी, लक्ष्मणराव सरदेसाई आणि वामन चोरघडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. रविन्द्रनाथ टागोरांच्या श्रीमती ह्या अनुवादित रुपककथेचाही या संग्रहात अंतर्भाव करण्यात आलेला आहे. कथेचे व्यवच्छेदक लक्षण सांगतांना सुप्रसिद्ध अमेरिकन टीकाकार क्लेटन हॅमिल्टन म्हणतो, की ‘उत्त्तम लघुकथेने मनावर एकच एक उत्कट परिणाम किंवा संस्कार करावा. हा परिणाम साधताना स्थळ, काळ, पात्र, प्रसंग, वर्णन यांचा फापटपसारा लेखकाने मांडता उपयोगी नाही. साधनांची काटकसर हा कलात्मक लघुकथेचा एक प्रमुख गुण आहे़ ’ लघुकथेत विषयाला किंवा घटनेला तादृश महत्त्व नसते, महत्त्व असते, ते जीवनाचे, त्यांच्या विविधतेचे, त्याच्या वास्तवतेचे त्या विविधतेकडे आणि वास्तवाकडे काव्यात्म, परंतु प्रामाणिक दृष्टिने पाहणाया लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे. या पाश्र्वभूमीवर या संग्रहातील कथांचा आस्वाद घेतल्यानंतर हरिभाऊ ते चोरघडे या कथाकारांनी मराठी लघुकथेच्या विकासाला केवढा हातभार लावला आहे, याची स्थूल कल्पना वाचकांना येईल.