1
/
of
1
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
स्पर्धा-परीक्षा आता आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग बनल्या आहेत – मग त्या एनटीएस/सीईटी असोत किंवा एमपीएससी/यूपीएससीच्या असोत! विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिन्ही समाजघटकांशी संबंधित असणा-या या स्पर्धा-परीक्षांचं महत्त्व ओळखून, यशाचं रहस्य उलगडून सांगणारं हे पुस्तक... वेळापत्रक आखण्यापासून इंग्रजीची भीती घालवण्यापर्यंत, टिपणं काढण्यापासून उत्तरं लिहिण्यापर्यंत, अक्षर सुधारण्यापासून मुलाखतीची पूर्वतयारी करण्यापर्यंत सर्व बाबतींत अत्यंत व्यावहारिक सल्ला देणारं हे पुस्तक... 'आधी केले, मग सांगितले' या उक्तीला अनुसरून स्पर्धा-परीक्षांमध्ये यशस्वी होऊन उच्चपदावर आरूढ झालेल्या एका तडफदार तरुणानं वडीलभावाच्या भूमिकेतून लिहिलेलं हे पुस्तक... केवळ मार्गदर्शनच करणारं नव्हे, तर यशाबद्दल प्रचंड आत्मविश्वास मनामनात जागवणारं हे पुस्तक आजच्या तरुणाईसाठी नवं क्रांतिगीत घेऊन आलं आहे. त्या क्रांतिगीताचेच शब्द आहेत - 'हम होंगे कामयाब!' "
Share
