Shipping calculated at checkout.
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना!म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं.आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत.
काही नाती असलेल्या नातेसंबंधांच्या पलीकडे जुळतात. या नात्यांत सखोलता असते आणि ही नाती आयुष्यभर अमीट ठसा उमटवून जातात. मालिकेतील या पुस्तकात अशाच काही नात्यांच्या आठवणी उलगडत आहेत…. गुलजार, सचिन तेंडुलकर, अभिषेक बच्चन, डॉ. पी. डी. पाटील, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संजय राऊत, राजू परुळेकर, नितीन चंद्रकांत देसाई, सुशीलकुमार शिंदे, विनय सहस्रबुद्धे, अरविंद जगताप, प्रभा गणोरकर, मल्लिका अमरशेख, रश्मी कशेळकर आणि प्रगती बाणखेले ।