Shipping calculated at checkout.
'टीकास्वयंवर / जास्वंद / छान्दसी / पोत / युगान्त / हरिभाऊ / विश्रब्ध शारदा / ज्ञानदेवी / माझा प्रवास / ज्वाला आणि फुले / झुल / अमृतसिद्धी / गोखले चरित्र गंथांवरिल लेख म्हणजे केवळ गंथपरीक्षणे नव्हेत. किंबहुना ग्रंथपरीक्षणाची कडवी शिस्त मला-माझ्या स्वभावाला मानवणारीही नाही. या ग्रंथाबाबत लिहीताना अनेकदा आपोआप काही विचार मनात आले, काही प्रश्न उभे राहिले. कित्येकदा तर एकूण मराठी वाड्.मयप्रवाहाबाबतच काही कोडी पडली. ते सर्व खुलेपणाने येथे लिहलेले आहे. कीर्तनकार जसे मूळ आख्यान सोडून इकडेतिकडे फिरतो, तसेच काहीसे इथे झाले आहे. मात्र कीर्तनकाराप्रमाणे अधिकारवाणीने ‘सांगण्या’पेक्षा जाणण्या’चे कुतूहल बाळगणे मी अधिक पसंत करतो. मराठी साहित्य आणि मराठी समीक्षा यांबाबत माझ्या मनात जे कुतूहल प्रारंभापासून आहे, ते इथे मोकळेपणाने वावरते आहे, असे म्हणूयात.