Regular price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
Sale price
Rs. 234.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
त्या गुप्त जगातील एक दृश्य : चार तरुण मुलींचा प्रेम, अभिलाषा आणि इस्लामिक रूढी ह्यांच्या अरुंद खाडीतून केलेला तो प्रवास. प्रत्येक आठवड्यात शुक्रवारची प्रार्थना संपल्यावर एक ई-मेल ऑनलाईन नेटवर्कवरील सदस्यांत प्रसारित केली जाते. रियाधमधील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या गाम्राह, मिचैल्ली, सादीम आणि लामीस या चार उच्च स्तरीय विद्यार्थिनींच्या आयुष्यातील विदारक वास्तव वर्षभराच्या कालावधीत समोर आले. एकीकडे उच्च स्तरात आणि दुसरीकडे रूढींमध्ये अडकलेल्या या मुली आहेत. या पेचातून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या नकळत केलेले डेटिंग, अनुभवलेले शहरी जगणे, सेक्स आणि यातून त्यांच्या आयुष्याची झालेली पडझड आपल्यासमोर येते. एकविसाव्या शतकातील सुशिक्षित तरुणीला अजूनही जुन्या पद्धतीने जगणाऱ्या समाजात वाढत असताना, न संपणाऱ्या सांस्कृतिक मतभेदांना सामोरे जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या तरुण सौदी स्त्रियांच्या गुंतागुंतीच्या जीवनातून प्रकटलेली एक दुर्मीळ आणि अविस्मरणीय जाणीव म्हणजे ‘गल्र्स ऑफ रियाध’! त्यांच्या आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याहून कितीतरी वेगळ्या असणाऱ्या संस्कृतीच्या समाजात प्रकट होत आहेत, ही एक लक्षणीय बाब म्हणावी लागेल.