Regular price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 405.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
एकंदरीत मानवी संस्कृतीच्या प्रगतीमध्ये गणित या विषयाचा सिंहाचा वाटा असूनही गणित, गणितज्ज्ञ आणि गणिताचा इतिहास या बाबतीत समाजात सर्वसाधारणपणे अनभिज्ञता आढळते. अच्युत गोडबोले आणि माधवी ठाकूरदेसाई या लेखकद्वयीनं मात्र या परिस्थितीला छेद देऊन अगदी अनादी काळापासून ते आजच्या आधुनिक उच्चस्तरीय गणितापर्यंतच्या या विषयाच्या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे, ते गाठण्यात मह त्त्वाचा वाटा असणारे गणितज्ज्ञ आणि एकूणच गणिती प्रक्रियेचा गुंतागुंतीचा इतिहास वाचकांपुढे अत्यंत रंजकपणे मांडला आहे - त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडके! गणितासारख्या गहन विषयाबद्दल सोप्या भाषेत आणि तेही मर्यादित काळात लिहिण्याला साहजिकच काही मर्यादा येतात आणि मांडणीमध्ये त्रुटीही संभवतात. प्रस्तुत पुस्तकात अशा अडचणींवर बव्हंशी मात केली आहे. वाचकांनी पुस्तकातली सर्व विधानं प्रमाणभूत न मानता कुतूहल चाळवेल तिथं अधिक खोलात जाऊन विषय जाणून घ्यावा, असं घडलं तर माझ्या दृष्टीनं अच्युत आणि माधवी यांच्या कर्तबगारीचं आणि अथक श्रमाचं सार्थक झालं असं म्हणता येईल.